SMS व्दारे सूचना, निमंत्रण प्राप्त करा

श्री वासुदेव निवास मध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात वार्षिक उत्सव, नैमित्तिक कार्यक्रम तसेच महायोग शिबिरे यांचा समावेश असतो. श्रीवासुदेव निवास चे प्रधान विश्वस्त प.पू. श्री शरदशास्त्री जोशी महाराज यांचे महाराष्ट्रात तसेच राज्याबाहेरही विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. पुणे शहरात तसेच पुण्याबाहेर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे निरोप SMS व्दारे त्या-त्या शहरातील आणि विभागातील साधकांना पाठविले जातात. अशा कार्याक्रमंचे निरोप SMS व्दारे प्राप्त करण्यासाठी खाली आपले नाव, गाव आणि मोबाईल क्रमांक द्यावा.
ज्यांना सध्या SMS व्दारे निरोप प्राप्त होत आहेत त्यांनी पुन्हा आपला मोबाईल नंबर देण्याची आवश्यकता नाही.  आपला मोबाईल नंबर बदलला असेल तर फॉर्म परत एकदा भरा.