श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

आश्रम वृत्त

महायोग दीक्षाधिकारी संमेलन

sammelan

दि. १३ मे २०१८ रोजी श्री वासुदेव निवास मध्ये कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षाधिकारी संमेलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण भारतातून आलेल्या सुमारे पन्नास दीक्षागुरूंची उपस्थिती या संमेलनाला लाभली. श्रीवासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. श्री शरदशास्त्री जोशी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून संकेश्वर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य महाराज आणि नारायण कुटी, देवासचे प्रधान विश्वस्त प. प. श्रीसुरेशानंदतीर्थ स्वामी महाराज लाभले होते. 

श्री वासुदेव निवासचे विश्वस्त पू. श्री देविदास जोशी महाराज यांनी प्रास्ताविक केले.  प. पू. श्री शरदशास्त्री जोशी महाराज, प. प. श्रीहरिओमतीर्थ स्वामी महाराज, मांडवे, श्रीब्रह्मचैतन्य स्वामी महाराज, छिंदवाड़ा, प. प. श्रीसुरेशानंदतीर्थ स्वामी महाराज, देवास यांनी सहभागी दीक्षाधिकारी मंडळींशी संवाद साधला, त्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन केले.

संमेलनाचे सूत्रसंचालन पू. श्री प्रमोद कुलकर्णी यांनी केले. विश्वस्त श्री देविदास जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.