tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे
kundalini-shaktipat-mahayoga-text-overlay

कुंडलिनी शक्तिपात महायोग

अलौकिक अनुभूति, अपार शांती आणि दिव्य आनंद देणारा साधनमार्ग

सर्वात प्राचीन, विशुद्ध, दुर्लभ साधनपद्धती

वेद, उपनिषदे, श्रीमद् भगवतगीता, श्रीज्ञानेश्वरी अशा विविध ग्रंथांतून गौरविलेला पंथराज  

peace
अलौकिक आनंद, शांती आणि समाधान प्राप्ती ​

शरीर, मन, बुद्धी आणि प्राण यांचे शुद्धीकरण करून प्रसन्न दैवी शांतीचा साक्षात्कार देणारा साधनमार्ग 

धर्म, जाती, वंश, लिंगभेद विरहित विश्वात्मकता

विश्वात्मक चैतन्यशक्ती अर्थात कुंडलिनी भगवती हीच सर्वांची माता असल्याने भेदभाव  विरहित वैश्विक सिद्धयोग    

blessings
प्रदीर्घ आणि दिव्य सद्गु्रु परंपरेची धारा

कुंडलिनी शक्तिपात महायोग साधनमार्गाची हजारो वर्षांची उज्वल, दैदिप्यमान परंपरा 

महायोग सर्वांहून निराळा, प्रभावी आणि निश्चित परमानंद देणारा आहे

भारतीय तत्वज्ञानानुसार आत्मज्ञान प्राप्त करणे हेच मनुष्यजन्माचे प्रमुख ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी भक्ति, ज्ञान आणि योग असे विविध मार्ग मानवजातीसमोर उपलब्ध आहेत. यापैकी योगशास्त्रातील हठयोग, मंत्रयोग, राजयोग, लययोग हे जिज्ञासूंना परिचित असलेले मार्ग आहेत. या सर्व मार्गांहून वेगळा, दिव्य आणि साधकाला प्रत्यक्ष अनुभूती देणारा योगमार्ग म्हणजेच महायोग अर्थात कुंडलिनी शक्तिपात योग.

हठयोग आणि इतर सर्व मार्गातील साधना या साधकाला स्वप्रयत्नाने कराव्या लागतात. त्यात कष्ट आणि धोके आहेतच. याउलट महायोगाच्या साधकाला स्वतःहून काहीच करायचे नसते. सदगुरुंच्या संकल्पशक्तीने आणि साधकाच्या योग्यतेनुसार त्याच्या  साधन उन्नतीसाठी आवश्यक ती क्रिया आपोआप होते. महायोग हा मानवजातीला ज्ञात असलेल्या सर्व साधन प्रकारात सर्वात प्राचीन, सुलभ आणि अनुभवसिद्ध आहे.

महायोगामध्ये सदगुरुंच्या संकल्पशक्तीच्या प्रभावाने साधकाची कुंडलिनीशक्ती जागृत होते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याने साधकाला निरनिराळ्या प्रकारचे शारीरिक, मानसिक आणि प्राणाच्या पातळीवरील अनुभव येतात. सदगुरू कृपेला साधनेची जोड मिळाल्याने साधकाची बहिर्मुख प्रवृत्ती अंतर्मुख बनते. साधकाच्या अवस्थेप्रमाणे कुंडलिनी शक्तीच्या षटचक्र भेदनाच्या प्रवासातील विविध, विलक्षण, दिव्य अनुभव येतात. निष्ठेने साधन करणाऱ्या साधकाला शेवटी दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते.

महायोगाला सिद्धयोग, कुंडलिनीशक्तीयोग, शक्तिपात योग अशा विविध नावांनी ओळखले जाते. श्रीमद्भगवतगीता आणि ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी मध्ये महायोगाला सर्वश्रेष्ठ मार्ग असे म्हटले आहे. महायोग हा वेदांनी प्रतिपादन केलेला, साधकाला तत्काळ अनुभव देणारा, आत्मदर्शन करून देणारा गुह्य मार्ग आहे.

muladhar-lotus-sahasrsr-lace

शक्तिपात महायोग सर्वश्रेष्ठ आहे

योगशास्त्रानुसार कुंडलिनी शक्तीचे वास्तव्य मूलाधारात आहे. विश्वात्मक चैतन्य शक्ती, आदिमाया ती हीच. साडेतीन वेटोळे करून कुंडलिनी शक्ती मुलाधारामध्ये सुप्त अवस्थेत असते. ही शक्ती व्यापक, नित्य अशी असून अनेक जन्मांच्या संस्काररुपी  जाळ्यात ती गुंतलेली असते. तिचे जागरण झाल्यानंतरच साधकाचा परमात्म मार्गावरील प्रवास खऱ्या अर्थाने सुरु होतो. हठयोगाच्या उपायांनी तिचे जागरण करणे अत्यंत खडतर आणि जोखमीचे आहे. त्यासाठी सिध्द गुरूंचे पदोपदी मार्गदर्शनही अत्यावश्यक आहे. 

हठयोगाच्या मार्गाने कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी साधकाला स्वतःला कष्टप्रद आणि चिकाटीचे प्रयत्न करावे लागतात. याउलट महायोगात सदगुरुंच्या कल्याणकारी, दिव्य संकल्पशक्तीने शिष्याला दिक्षेच्या वेळीच कुंडलिनी शक्ती जागृतीचा अनुभव येतो. 

कुंडलिनी शक्ती जागृतीची, अध्यात्म मार्गात उन्नतीची तळमळ लागलेला मुमुक्षु सदगुरूंकडे दिक्षेची प्रार्थना करतो. एका दिव्याने दुसरा दिवा लावावा त्याप्रमाणे आर्त मुमुक्षुला सदगुरू सुयोग्य मुहूर्तावर संकल्प दीक्षा देतात. दिक्षेसाठी मुमुक्षु साधक आणि सदगुरू समोरासमोर किंवा एकाच ठिकाणी असण्याची आवश्यकता नसते. दीक्षा घेणारा साधक आपल्या गावात, घरी, परदेशात कुठेही असू शकतो आणि सदगुरू त्यांच्या स्वतःच्या स्थानी असतात. शक्तिपात दिक्षेमुळे साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होते, ती ऊर्ध्वगामी होते. साधकाच्या अनेक जन्मातील कर्मांची आवरणे काढून टाकून साधकाला त्याच्या मूळ, शुध्द स्वरुपात आणण्याच्या कामाला ती झपाट्याने लागते. या प्रवासात साधकाला त्याच्या शारीरिक, मानसिक आणि प्राणाच्या शुद्धीकरता हठ, मंत्र, राज, लय योगातील विविध, अवर्णनीय आणि अकल्पनीय क्रिया आवश्यकतेप्रमाणे होतात. साधनाच्या उच्च अवस्थेत मन आणि प्राण यांचा पूर्ण लय होतो. पतंजली महामुनींनी वर्णिलेली ‘चित्तवृत्ती निरोधः’ या अवस्थेप्रत तो जातो, त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते.

श्रीवासुदेव निवास, महायोगाचे आद्यपीठ

भगवान श्रीमहादेवांकडून प. प. श्रीगंगाधरतीर्थ स्वामी महाराजांना महायोगाचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनी प. प. श्रीनारायणदेव तीर्थ स्वामी महाराज या एकमेव शिष्याला शक्तिपात महायोगाचे अमोघ दीक्षादान दिले. पुढे त्यांचे शिष्य प. प. श्रीशंकरपुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांनी आणि त्यांचे शिष्य प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांनी कुंडलिनी शक्तिपात महायोगाचा लाभ जिज्ञासू साधकांना करून दिला. प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराजांना भगवती मातेने ‘दक्षिणेकडे जा’ अशी आज्ञा केली. स्वामी उत्तरेतून दक्षिणेकडे निघाले असता त्यांची भेट मध्य प्रदेशात नर्मदातटी होशंगाबाद येथे श्रीगुळवणी महाराज यांचे बरोबर झाली. प. प. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी शक्तिपात विद्या श्रीगुळवणी महाराजांना प्रदान केली आणि या विद्येचा प्रसार लोककल्याणार्थ करण्याची आज्ञा दिली. श्रीगुळवणी महाराजांनी सुमारे पंचाहत्तर वर्षांपूर्वी बार्शीच्या गोपिकाबाई यांना पहिली महायोग दीक्षा दिली.

१९६५ साली श्री वासुदेव निवासची स्थापना झाली पण त्यापूर्वीपासूनच महाराष्ट्र आणि भारतातील हजारो आर्त जिज्ञासू प. पू. श्रीगुळवणी महाराजांकडून दीक्षित होऊन कुंडलिनी शक्तिपात महायोगाच्या आत्मकल्याणाच्या मार्गावर वाटचाल करित होते. पुढे ब्रह्मश्री प.पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर आणि त्यांनंतर योगतपस्वी प.पू. श्रीनारायणकाका ढेकणे महाराज यांनीही श्रीवासुदेव निवासचे हे कार्य निष्ठेने पुढे नेले. पंचाहत्तर वर्षांपूर्वी बार्शीमध्ये लावलेल्या या बीजाचा विस्तार आता विश्वव्यापी विशाल वटवृक्षामध्ये झाला आहे. श्रीवासुदेव निवासचे विद्यमान प्रधान विश्वस्त प. पू. श्रीशरदशास्त्री जोशी महाराज यांच्या आजी गोपिकाबाई या श्रीगुळवणी महाराजांच्या पहिल्या शिष्या होत्या हा ही एक विलक्षण योगायोग आहे

सद्गुरू साधक सुसंवाद

दक्षिणेत महायोगाची गंगा प्रवाहित करणारे श्रीवासुदेव निवासचे संस्थापक सदगुरू योगीराज श्रीगुळवणी महाराज आणि
जिज्ञासूंमध्ये महायोगाविषयी झालेल्या सुसंवादाचे संकलन 

शक्तिपात महायोग व्यक्तीच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठीच आहे. ​

शक्तिपात दीक्षा घेण्यासाठी धर्म, जात, लिंग, आर्थिक परिस्थिती यापैकी कोणताही भेद लागू नाही की कोणता खर्च करावा लागत नाही. विशुध्द ज्ञानाची, परमात्म्याच्या भेटीची तीव्र आर्तता लागून राहिलेल्या आणि त्या ध्येयासाठी सदगुरूंनी दिलेले साधन निष्ठेने करण्याची तयारी असेल्या तसेच आचार, आहार आणि विचार यांच्या सामान्य नियमांचे पालन करण्याची तयारी असलेल्या कोणाही मानवास शक्तिपात दीक्षा घेता येते.

महायोग लेखसंग्रह

कुंडलिनी शक्तिपात महायोगाविषयी साधन परंपरेतील ज्येष्ठ महापुरुषांनी केलेले सखोल मार्गदर्शन आणि चिंतनपर विपुल लेखन उपलब्ध आहे. त्यातील काही निवडक लेख वाचा.  

कुंडलिनी शक्तिपात महायोगाची दीक्षा घेणाऱ्यांसाठी सामान्य नियम

१: श्री मद्भगवतगीतेत सांगितलेल्या योगाच्या प्रत्यक्ष अनुभवाची तीव्र इच्छा व गुरुवचनावर श्रद्धा असावी.
२: वडिलधाऱ्या व्यक्तींची अनुज्ञा असावी. पती-पत्नीत एकमेकांची सहनुमती असावी.
३: सर्वव्यापी चैतन्याचा मी एक अंश आहे अशी दृढ श्रद्धा असावी.
४: मद्यपान, मांस, अंडी, कांदा, लसूण इत्यादी पूर्णपणे वर्ज्य करावे. तसेच तंबाखूचे कोणतेही व्यसन  वर्ज्य करावे.
५: साधकाच्या घरात मासिकधर्माच्या नियमांचे पालन अवश्य करावे. 
६: रोज नियमितपणे एक तास साधना करावी.
७: कुंडलिनी भगवती हीच आपणा सर्वांची माता असल्याने धर्म, जात, वय, लिंग, इत्यादी कोणताही भेद दीक्षा घेण्यास आड येत नाही. एरव्ही व्यवहारातही सर्वांप्रती बंधुभाव असावा.
 

कुंडलिनी शक्तिपात महायोगाविषयी सखोल मार्गदर्शन करणारी श्री वासुदेव निवासची प्रकाशने

yogwani
योगवाणी
mahayog-vidnyan
महायोग विज्ञान
sadguru-sadhak-susanvad
सदगुरू साधक सुसंवाद
sut-sanhita-rahasya-1
सुत संहिता रहस्य भाग १, २
siddhayoga-mahayoga
सिद्धयोग (महायोग)

वरील सूचना, नियम यांचे पालन करण्याची तयारी असलेल्या जिज्ञासूनी
महायोग दिक्षेसाठी खालील प्रार्थनापत्र भरून पाठवावे.