tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजकृत प्रश्नावली

tembe-swami-standingवैयक्तिक, कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी, मंगल कामनांची पूर्तता व्हावी यासाठी उपासनेचे बळ आवश्यक असते. यासाठी आवश्यक असलेली नेमकी उपासना ब्रह्मज्ञानी संतांनी सांगितलेली असेल तर कामनापूर्ती लवकर होते असा सर्वांचा अनुभव असतो. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी तयार केलेली प्रश्नावली संकटात सापडलेल्या भक्तांना नेमके मार्गदर्शन करते. श्रीवासुदेव निवासने प्रश्नावली छापील स्वरुपात प्रकाशित केली आहे. त्याच मूळ प्रश्नावलीचे हे संगणकीय संस्करण आहे.

प्रश्नावली कशी पाहावी?
प्रश्नावली चे पृष्ठ उघडा. प्रश्नावली हा एकूण ५७६ अक्षरांचा तक्ता आहे. आपल्या समस्येचे निवारण व्हावे, मंगल कामनांची पूर्तता व्हावी यासाठी आपली कुलदेवता, इष्टदेवता आणि प. प. श्रीस्वामीमहाराजांना डोळे मिटून प्रार्थना करावी. डोळे मिटलेले असतानाच प्रश्नावली तक्त्यावर वर क्लिक करा. ज्या ठिकाणी क्लिक केले गेले जाईल त्याप्रमाणे एक पॉप अप विंडो ओपन होईल. त्यात आपल्याला इष्ट उपासना सांगितलेली असेल. ही उपासना श्रद्धेने पूर्ण केल्यास संकटाचे निवारण होते, मंगल कामनांची पूर्ती होते असा हजारो भक्तांचा अनुभव आहे.