प . पू . योगीराज श्रीगुळवणी महाराज यांचा
५१ वा पुण्यतिथी महोत्सव
१५ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२५ पर्यंत प्रतिवर्षाप्रमाणे श्रद्धा व भक्तीने, तसेच मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे.
या निमित्त सर्वांनी अगत्यपूर्वक यावे.
आपले
श. ज. जोशी (प्रधान विश्वस्त)
सु. अ. दामले, दे. गं. जोशी, आ. मु. कुलकर्णी, मो. वि. घैसास. विश्वस्त- श्री. वासुदेव निवास.
गुरुतत्व हेच ईश्वरी तत्व आहे तसेच ते विश्व व्यापक आहे, त्याचे वर्णन ‘वासुदेवः सर्वम्’ असेच आहे या भुमिकेतून परमपूज्य योगीराज सदगुरू श्रीगुळवणी महाराजांनी सन १९६५ साली ‘श्रीवासुदेव निवास’ ची स्थापना ‘१२/४७, कर्वे पथ, एरंडवणे, पुणे’ येथे केली.
‘श्री वासुदेव निवास’ शक्तिपात योगविद्येचे आद्यपीठ आणि नित्य प्रकाशित दीपस्तंभ म्हणून जगभर विख्यात आहेच. तसेच प. पू. श्री महाराजांच्या मातोश्री सौ. उमाबाई यांना भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका प्रसाद रूपाने प्राप्त झाल्या, त्याच ‘श्रीप्रसाद पादुका’ श्रीवासुदेव निवासमध्ये अधिष्ठित आहेत.
वेद, उपनिषदे, श्रीभगवतगीता आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी मध्ये ‘पंथराज’ म्हणून गौरविलेल्या कुंडलिनी शक्तिपात महायोगाचा वैश्विक प्रसार आणि भक्ती, उपासनेच्या प्रकाशात लाखो भक्तांचे जीवन उजळविण्याचे कार्य गेली पन्नासहून अधिक वर्षे श्री वासुदेव निवास करत आहे.
संस्थापक योगीराज प. पू. श्रीगुळवणी महाराज, त्यांनंतर ब्रह्मश्री प. पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर, योगतपस्वी प.पू. श्रीनारायणकाका ढेकणे महाराज आणि विद्यमान प्रधान विश्वस्त श्री शरदभाऊ जोशी महाराज यांच्या प्रासादिक नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ‘श्री वासुदेव निवास’ कुंडलिनी शक्तिपात महायोग आणि श्रीदत्तात्रेय उपासना मार्गातील दीपस्तंभ म्हणून अखंड कार्य करीत आहे, कार्याचा विश्वात्मक विस्तार होत आहे.
शक्तिपात महायोग, भक्ती आणि उपासना यांचा अपूर्व संगम असलेले मूळपीठ
उपासना आणि भक्ती
योजीराज प. पू. श्रीगुळवणी महाराजांच्या घराण्यात अनेक पिढ्यांची श्रीदत्तात्रेय उपासना होती. दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांंनी श्रीगुळवणी महाराजांना मंत्रोपदेश केला, स्वतःमध्ये श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडविले. पुढे श्रीगुळवणी महाराजांनी घराण्यातील श्रीदत्तात्रेय उपासनेचा वारसा अधिक वृद्धींगत केला. हाच वारसा श्रीवासुदेव निवास पुढे चालवीत आहे.
कुंडलिनी शक्तिपात महायोग
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी शक्तिपात कुंडलिनी महायोगाची धारा महाराष्ट्राच्या भूमीत योगीराज श्रीगुळवणी महाराजांच्या रुपाने प्रवाहित केली. श्रीवासुदेव निवास मध्ये हा गंगौघ अधिक व्यापक झाला. सर्वात प्राचीन, सुलभ आणि अलौकिक आनंदाची अनुभूती देणारी ही साधनगंगा तीत सुस्नात होणाऱ्या प्रत्येकाला पावन करते. श्री वासुदेव निवास शक्तिपात महायोगाचे मूळपीठ आहे.
आकाशवाणीवरील पन्नास वर्षांपूर्वीचे ध्वनिमुद्रण
प. पू. सद्गुरु योगीराज श्री गुळवणी महाराजांनी दि. १९ सप्टेंबर १९७३ रोजी आकाशवाणीवर एक चिंतन प्रसारीत केले होते त्याला १९ सप्टेंबर २०२३ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. हे चिंतन श्री गुरुमहाराजांच्याच वाणीमध्ये ऐकणे ही सर्व साधक, हितचिंतक व भक्तांसाठी साठी सुवर्ण पर्वणी आहे. पुणे आकाशवाणीच्या सौजन्याने हे ध्वनिमुद्रण प्राप्त झाले आहे.
श्री वासुदेव निवास दर्शन
नित्यसेवा ऑनलाइन बुकिंग सुविधा
श्रीवासुदेव निवास मध्ये सुरु असलेल्या विविध सेवा, अन्नदान, विशेषसेवा यांचे योगदान देण्यासाठी ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.
आपले प्रश्न, आपल्या समस्या श्रीस्वामी महाराजांना सांगा
वैयक्तिक, प्रापंचिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या भक्तांना मार्गदर्शन करणारी प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजकृत प्रश्नावली पाहा.
श्रीवासुदेव निवासची प्रकाशने
श्री वासुदेव निवासचा प्रकाशन विभाग गेल्या पन्नासहून अधिक वर्षांपासून कार्यरत आहे. या काळात प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची समग्र ग्रंथसंपदा तसेच महायोग साधना, उपासना, भक्ती, वेदांत या विषयांवरील संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विविध ग्रंथ श्रीवासुदेव निवासने प्रकाशित केले आहेत. ना नफा तत्वावर अत्यंत माफक शुल्कात हे ग्रंथ उपलब्ध आहेत.
व्हाट्सअप व्दारे सूचना, निमंत्रणे प्राप्त करा
समग्र ग्रंथसंपदा मोफत डाउनलोड करा
श्री वासुदेव निवास त्रैमासिक
सगुण निर्गुण
श्री वासुदेवनिवास चे प्रधान विश्वस्त प. पू. शरदशास्त्री जोशी महाराज यांचे दैनिक महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित केले जाणारे चिंतनात्मक लघुलेख वाचा.